Description
कार्तिक महिन्यात वद्य पक्षाच्या एकादशीला भगवान विष्णूच्या एकादश इंद्र यांनी मिळून एक प्रकट तेज निर्माण झाले तेच मिळून दिव्य आयुधारी अशी एक तपस्वी देवी प्रकट झाली. तिला एकादशी या नावाने ओळखले जाते. ह्या पुस्तकामध्ये एकादशीचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्तव संक्षिप्त रूपात विश्लेषण केले आहे. ह्या पुस्तकामध्ये संपूर्ण २६ एकादशीचे पुराणातील माहात्म्य नमूद केले आहे. ह्यामध्ये पुष्टीमार्ग तथा मर्यादामार्ग ह्याप्रमाणे महत्तव दर्शविले आहे. आणि पुष्टीमार्ग तथा मर्यादामार्ग ह्यातील भेद सुद्धा दर्शविले आहे. सामान्यपणे उत्पती एकादशीच्या माहितीमध्येच मातेची आरती समाविष्ट केलेली असते. परंतु, इथे वेगळ्या पद्धतीने एकादशी मातेची माहिती आणि आरती नमूद केलेली आहे. ह्या पुस्तकामध्ये एकादशीचे व्रत, एकादशीची फळप्राप्ति, एकादशीच्या दिवशी ग्रहण करायच्या प्रसाद याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आहार घेऊन जरी एकादशीचे व्रत करायचे असेल तर आहाराविषयी माहिती तसेच भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी लागणारा नेवैद्य येथे नमूद केला आहे.
Reviews
There are no reviews yet.